मुलचेरा : तालुक्यातील मुखडीटोला ( मछली ) येथील शहिद विर बाबुराव शेडमाके मुखडीटोला ( मछली ) यांच्या वतीने भव्य खुले व ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर उदघाटन सामाजिक कार्यकर्ते चालेवार काकाजी – गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य गणेश तलांडे – अंबटपाल्ली ग्रामपंचायत सरपंच उमेश कडते – ग्रापं.सदस्य शुभम शेंडे यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन पार पाडले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंबाटपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कडते – गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम शेंडे होते.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं – काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.
उदघाटन वेळी सचिव ग्रामपंचायत गोमणी उमेश ढोडरे,गणेश तलांडे,हलमी सर,तलाठी कार्यालय गोमणी चिंतामवार सर,पोलीस पाटील मुखडी टोल शंकर मडावी,गोमणी ग्रामपंचायतचे सरपंच जिजाबाई मडावी,यशवंतराव मॅडम,गोमणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिनशे उरतेसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील समस्त नागरिक तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.