अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील श्रीनिवास नामदेव गद्देपाकवार यांची काही दिवसांपासून नेत्रा *( डोळे )* निकामी झाल्यामुळे नेत्राची ऑपरेशन करिता ते तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील एक खाजगी दवाखान्यात जायचं होती.मात्र गद्देपाकवार कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलखीची असल्यामुळे श्रीनिवास गद्देपाकवार यांनी दवाखान्यात जाण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.
आज काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे श्रीनिवास गद्देपाकवार यांनी कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.त्यांची अडचण बघून एक हात पुढे करत अजयभाऊ कंकडालवार यांनी नेत्रा ऑपरेशन करिता आर्थिक मदत करण्यात आली आहे.त्यावेळी त्यांनी अजयभाऊंची आभार मानले.
यावेळी काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,महेश लेखूर,प्रकाश दुर्गे,नरेंद्र गर्गमसह आदी उपस्थित होते.