अहेरी : मुसळधार पावसाने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे पाहणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली.
आहेरी तालुक्यात मागील पाच-सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे देवलमरी – मोद्दूमतूरसह अनेक मुख्य रस्ते बंद आहेत.बंद रस्त्याने नागरिकांना आवागमन करण्यास नागरिकांना अडचण निर्माण होत आहे.माजी जि.प.अध्यक्ष अजय कांकडलवर यांनी सदर पूर्वग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली व सतर्क राहण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह काँग्रेस स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.