अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.या ठिकाणी नागरिकांना आवागमन करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
अहेरी तालुक्यातील अनेक विकासकामे सुरू आहे.आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड मार्गावर पुलंचे बांधकाम करण्यात येत आहे.सदर काम पर्यायी रस्ते तयार न करताच सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावं अलगाता आहे.
परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी व आरोग्य सुविधेकरीता तालुका व जिल्हास्तरावर जाणे कठीण झाले आहे.त्याकरीता या दोन्ही मार्गावर पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व होणाऱ्या त्रासाला जवाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.
१५ दिवसात कार्यवाही व पक्का रस्त्याचे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अन्यथा १३ ऑगस्ट २०२४ पासून आलापल्ली – सिरोंचा, आलापल्ली भामरागड, आलापल्ली अहेरी व आलापल्ली आष्टी या चारही मार्गावर राष्ट्रीय कांग्रेस पक्ष तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पत्राद्वारे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
अप्पर जि्हाधिकारी श्री. विजय भाकरे साहेब यांना निवेदन देताना श्री.अजयभाऊ कंकडालवार सहीत माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलाडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच अशोक येलमुले राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते