अहेरी : अनेक वर्षांपासून वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील राजपूर पॅंच येथील नागरिकांना जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी उपविभागीय समितीकडे अपिल केले होते.त्यानुसार अनेक नागरिक नागपूर येथील उपविभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपली बाजू मांडले असता.काँग्रेस अहेरी विधानसभाचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांनी त्या नागरिकांना जाण्यायेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून दिली.
अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच परिसरातील अनेक नागरिकांचे वनहक्काचे दावे २०२१ मध्ये जिल्हास्तरीय समितीने फेटाळले होते.त्यामुळे व्यथित होऊन या नागरिकांनी न्याय मागण्यासाठी उपविभागीय वनहक्क समितीकडे अपिल केले होते.त्यावर उपविभागीय वनहक्क समितीचे सचिव तथा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी सुनावणीसाठी उपविभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती.
त्यामुळे येथील नागरिक आपल्याकडील पुराव्यांसह नागपूरसाठी रवाना झाले.सुनावणीसाठी हजर होणे आवश्यक असल्याने अजयभाऊ कंकडलावार यांनी सर्वांसाठी चारचाकी वाहनांची व्यवस्था करून दिली.त्यामुळे त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे आभार मानत आपल्याला आता योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.