अहेरी : तालुक्यातील गडअहेरी येथील रहिवासी पोचूबाई बापू सिडाम यांच्या घर खूप जुन्याचा असून या पाऊसांमुळे यांच्या घरात पाणी शिरले होती.सिडाम परिवार अत्यंत गरीब असून त्यांना ताडपत्री घेण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक अडचण भासत होती.
हीबाब काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळतच कंकडालवारांनी पोचूबाई सिडाम हिला अहेरी जनसंपर्क कार्यालया येथे बोलवून त्यांना ताडपत्री मदत करण्यात आली आहे.सिडाम परिवाराला ताडपत्री मिळल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.त्यावेळी सिडाम कुटुंबातील समस्त सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.
त्यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,ताशू भैय्या शेख परिवहन सेल अहेरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष,विष्णु मडावी नगरपंचायत उपाध्यक्ष भामरागड,चिन्नु सडमेक,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच ,प्रमोद गोडसेलवार,पिंटू मडावी,प्रविण कोरेत आविसं,काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.