Home मुख्य बातम्या जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून दुचाकी अपघातातील गंभीर रुग्णाला उपचारासाठी आर्थिक मदत

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून दुचाकी अपघातातील गंभीर रुग्णाला उपचारासाठी आर्थिक मदत

28
0

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील विश्वनाथ मेश्राम – सुरेंद्र मडावी – दिनेश मडावी ‘या तीन युवकांनी आज अहेरी मुख्यालय येथील काही कामानिमित्त आले होते.काम ओढपून परत स्वगावी जात असतांना मेडपल्ली जंगाल परिसरातील दुचाकीवरील नियंत्रण सुटून काली पडल्याने त्या तीन युवकांची गंभीर जखमी झाले.त्यात एक युवकाला डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची प्रकृतीची विचारपूस करून त्या तीन युवकांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी सेवानिवृत्त साहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच कार्तिक तोगम, मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी,नरेंद्र गर्गम,स्वप्नील मडावी,अज्जूभाऊ पठाण,चंद्रकांत बेजलवार,रज्जाक पठाण,सचिन पांचार्य,राकेश सडमेक,रागाव गौरकरसह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here