अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आलापल्ली येथे शनिवारी प्रेन्डस क्रिडा व संस्कृतीक मंडळ तर्फे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजन केले आहे.अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात गोविंदा पथकांनी सहभागी होऊन दहीहंडी फोडली.
स्थानिक वीर बाबुराव चौक आलापल्ली मैदानावर कान्हा मटकीफोडा कार्यक्रमाची कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन पार पडली आहे.तसेच प्रथम क्रमांकाच्या पथकाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 55555/- रु देण्यात आली आहे.
त्यावेळी दहीहंडी स्पर्धेठिकाणी भाविक तसेच नागरिकांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनमंतू मडावी यांच्या कडून महाप्रसाद कार्यक्रमाही ठेवण्यात आली.दहीहंडीचे थर पाहण्यासाठी आलापल्लीत उसळली नागरिकांची गर्दी त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी समस्त जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुभेच्छा देऊन महाप्रसाद कार्यक्रमाला सुरवात केली.
या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हणमंतू मडावी होते.यावेळी मंचावर सौ.सोनालीताई कंकडालवार माजी उपसभापती अहेरी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,अशोकभाऊ रापेलीवार सामाजिक कार्यकर्ते,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,सरोज्या दुर्गे माजी सरपंच,वंदना दुर्गे सरपंच महागाव,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,नरेंद्र गर्गम,किशोर दुर्गे,तशू भाऊ शेख,राकेश रेड्डी,बबलूभाऊ, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे,पिंटू मडावी,प्रवीण कोरेतसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.