मुलचेरा : तालुक्यातील हरिनगर येथे आजाद हिंद फुटबॉल कमिटी द्वारे हरिनगर ग्रीनपार्क स्टेडियम मौदानवार भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.
तसेच द्वितीय पारितोषिक जे.एम.मोटर्स आलापल्ली कडून तृतीय पारितोषिक जनता सिटी अर्बन बँक कडून देण्यात येत आहे.अशी स्पर्धेला तीन पुरस्कार ठेवण्यात आली.कार्यक्रमाची उदघाटन गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम शेंडे यांच्या हस्ते करण्यात आली.अध्यक्ष म्हणून जे.एम.मोटर्स आलापल्ली कल्याण मंडल हे होते.यावेळी गोविंदपूर ग्रामपंचायतचे सरपंच प्रणव विश्वास,तपास मंडल,समीर अधिकारी,राबीन कर्मकार,संजित मंडल,प्रणव रॉय,सत्यन रॉय आदी उपस्थित होते.