एटापल्ली : तालुक्यातील तांबडा येथील जय मुंगराज क्रिडा मंडळ तांबडा द्वारा भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.स्पर्धेला द्वितीय पारितोषिक,तृतीय पारितोषिकही ठेवण्यात आली.
सदर स्पर्धेत परिसरातील तसेच इतर तालुक्यातील अनेक संघ भाग घेतले होते.कब्बड्डी अ.गट प्रथम पारितोषिक कृष्णार संघाला,द्वितीय पारितोषिक परसलगोंदि,ब.गट प्रथम तांबडा,द्वितीय पारितोषिक नागपूर, तृतीय पारितोषिक तांबडा संघाला मिळाले.
व्हाॅलीबाॅल प्रथम पारितोषिक कुकेली,द्वितीय पारितोषिक रेकणार,तृतीय पारितोषिक तांबडा संघाला मिळाले,महिला कब्बड्डी प्रथम पारितोषिक दोडी टोला,द्वितीय पारितोषिक तांबडा संघाला मिळाली असून येथील काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमला तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार,सदस्य रमेश वैरागडे,भास्कर मटामी,सोमजी गावडे,कपिल मठ्ठामी,पंकज भांडेकर,संदीप वैरागडे,रवी सुरजागडे,सदू दुर्वा,देऊ मठ्ठामी,दसरु मठ्ठामी,सुरेश दुर्वा,नानेश मठ्ठामी यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते





