Home अहेरी जिल्हा को-ऑफरेटीव्ह बँकेच्या संचालकपदावर काँग्रेसचे सुनील तेलकुंटलवार यांची अविरोध निवड

जिल्हा को-ऑफरेटीव्ह बँकेच्या संचालकपदावर काँग्रेसचे सुनील तेलकुंटलवार यांची अविरोध निवड

1
0

गडचिरोली : नुकताच गडचिरोली जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेची संचालक मंडळाची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ.अजयभाऊ कंकडालवार पुरस्कृत उमेदवार सुनील तेलकुंटलवार हे संचालक म्हणून अविरोध निवडून आले आहे.

एटापल्लीव भामरागड या दोन तालुक्यातुन एका संचालकाला निवडून द्यायचं होता. यात अ गटातून सुनील शंकर तेलकुंटलवार व दशरथ कोल्हा मडावी यांनी नामांकन दाखल केले होते.

परंतु काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या मध्यस्थीने मडावी यांनी एनवेळी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुनील तेलकुंटलवार यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाली.

यामुळे कंकडालवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थासह सहकार क्षेत्रात सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना मानाचे स्थान मिळवून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.बँकेचे संचालक म्हणून अविरोध निवडून आलेले तेलकुंटलवार यांची कंकडालवार यांनी पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.

बँकेचे संचालक म्हणून तेलकुंटवार यांना अविरोध निवडून आणण्यासाठी कंकडालवार यांच्या नेतृत्वात रमेश वैरागडे माजी संचालक कृ.उ.भाजरसमिती तथा विद्यमान ग्रा.प. सदस्य,, संदीप वैरागडे, प्रज्वल नागुलवार कॉग्रेस नेते, प्रशांत गजानन तेलकुटलवार, कपिल मठ्ठामी, ज्ञानेश मट्टामी दिनेश नरोटे, अशोक गावंडे, दीपक गावंडे आणि शिवाजी लेखामी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here