अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी पंचायत समिती अंतर्गतील व्येंकटरावपेठा ग्राम पंचायतीचे ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केले. असे अनेक मुद्दा घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी मंगळवार 2 मे पासून पंचायत समितीच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.उपोषणात प्रशांत नामनवार यांनी ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांनी भ्रष्टाचार करून बनावट बिल जोडल्याने व शासकीय दस्ता ऐवजात खोड़तोड़ केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करुण निलंबित करण्यात यावी म्हणून नामनवार यांनी उपोषणला बसले.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांची थांबेक ठीक नसून सुद्धा उपोषणाला बसून प्रशासनाला मागणी करत आहे.जनकल्याण समाजोन्नाती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी उपोषणकार्ते प्रशांत नामनवार यांची भेट घेऊन हस्तेने विचारपूस करून उपोषणाला पाठिंबा दिले