अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी तालुक्यातील वेलगुर येथील मनीराम कासेवार यांना काही दिवसा अगोदर चक्कर येऊन खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती.मनीराम कासेवार यांच्या प्रकृतीची माहिती वेलगुर येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्तेकडून आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली,माहिती होताच त्यांच्या भाऊंना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून रुग्णालयात उपचार करण्या करिता आर्थिक मदत केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,गुलाब देवगळे ग्रा.प.सदस्य छल्लेवाडा,बाल्याभाऊ वोडेट्टीवार,सुनील कासेवार,विनोद रामटेके,राजाराम दुर्गे,सुनील रत्नम,विलास बोरकर,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.