अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
गडचिरोली : स्वतःच्या खिशाला कात्री लावून जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरीब रुग्णांसाठी निरंतर आर्थिक मदत करणारे निःस्वार्थ, सेवाभावी म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते,माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या सामाजिक कार्याला अख्या जिल्ह्यातच आजच्या घडीला तरी तोड नाही.
शहरी भागात गरीब रुग्णांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था,सेवाभावी समाजसेवक पुढे येतांना दिसून येतात.मात्र ग्रामीण भागात असे मदतीचे नाममात्र उदा.आपल्याला ऐकायला येतात. शहरी भागात सुरू असलेल्या सामाजिक संस्था व सेवाभावी वृत्तीचे समाजसेवकांच्या हाताने होत असलेल्या गरीब रुग्णांच्या रुग्णसेवेची जणूकाही वसा घेऊनच का होईना पण आज सर्वपरिचित असलेलं अजयभाऊ कंकडालवार नावाचं एक असामान्यतला सामान्य हा चेहरा जिल्ह्यातीलच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरिबांसाठी देवमाणूस ठरू लागलंय.
स्वतःच्या पाठीमागे सत्ता नावाचं ‘बिरुद’ असो किंवा नसो पण हा सर्वसामान्य चेहरा आपद्ग्रस्त व संकटग्रस्तांसाठी देवधुतच ठरू लागलंय.आपल्या स्वतःच्या सामाजिक कार्याच्या प्रसिद्धीपासून लांब असलेल्या अज्जूभाऊ नावाचं हा सर्वसामान्य चेहरा काही मोजक्याचं सेवभावीमध्ये मोडतात.स्वतःच्या कार्यकर्त्यांना करणारी मदत मात्र ‘उजव्या हाताने दिलेले दान… डाव्या हातालाही’कधीही कळू देत नाही. हे त्यांच्यात असलेल्या खूप मोठेपणा आहे.
- जिल्ह्यात अनेक नामवंत राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आहेत. परंतु या सगळ्यांपासून तर अज्जूभाऊचं सामाजिक कार्य मात्र हे निराळेच आहे.शोषित, वंचित व पीडित व गरजूंचे अश्रू पुसण्यात अजयभाऊंचे हात हे नेहमीच पुढे असतात ..हे विशेष