मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांचे हस्ते करण्यात आली आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे सहउदघाटक म्हणून येल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम – कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येल्ला ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते.
सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 21001/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद शाळा येल्ला – सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम यांच्या कडून 15001/- देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक विमलाताई ओल्लालवार शाळा – येल्ला येथील ग्रामसेवक प्रदीप गेडाम – प्र.ना.लिंगाजी टेकुलवार – प्र.ना.साईनाथ पानेमवार यांच्या कडून 10001/-देण्यात येत आहे.
यावेळी आविसं – काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.