Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निषेध सभेला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निषेध सभेला भेट देत पाठिंबा दिले

45
0

आलापल्ली : केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा पारित केला असुन या कायद्यामुळे 99 अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे.अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.

त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात.परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे
मारण्याचा प्रयत्नही केला जातो.त्यामुळे स्वत:च्या संरक्षना करीता काही वाहन चालक
घटनास्थळावरून पळ काढतात.त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना“हिट अँड रन”कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे.असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे.हा कायदा केन्द्र सरकारने तात्काळ रद्द करावा या करीता अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटना अहेरी – आलापल्लीच्या वतिने मौजा आलापल्ली येथील विर बाबुराव सडमेक चौकात काल पासुन केन्द्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले.

लोकशाहीच्या मार्गाने काही काळ रस्ता रोको करुन केन्द्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले.जर का केन्द्र सरकारने हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येत्या काळा तिव्र आंदोलन करणार असल्याचे वाहन चालकांनी
सांगीतले.त्यावेळी निषेध सभेला आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी यांनी भेट घेऊन वाहन चालकांची समस्या जाणून घेऊन जाहीर पाठिंबा दिले.

त्यावेळी आविसं काँग्रेसचे पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – असंख्य वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here