Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आलापल्लीतील कलावंतांना मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आलापल्लीतील कलावंतांना मदत

17
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील नवयुवक आदिवासी कलावंतांन व भजन मंडळींना भजनाच्या साहित्यासाठी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत दिली.

स्थानिक आलापल्ली येथील गणेश उत्सव आणि दुर्गा नवरात्री उत्सव मोठ्या थाटात पार पडतात.दरम्यान मंडळाकडून भजन कार्यक्रमाही आयोजित करण्यात येते.मात्र भजना मंडळाकडे साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांना भजन कार्यक्रमा वेळी अडचण भासत होती.कलावंत व भजन मंडळींना भजनाकरीता साहित्य घेण्यास मदतीची गरज असल्याने.

आज नवयुवक आदिवासी भजन मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची अडचण बाबत सांगितले होते.त्यावेळी कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता भजन मंडळाना साहित्य घेण्यास आर्थिक मदत केली.त्यावेळी आलापल्ली भजन मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी अजय कंकडालवार यांचे आभार मानले आहे.

यावेळी मनोज सडमेक,योगेश कोतावर,ऋषी नैताम,चिंना मुरमुरवार,गणेश मोहूर्ले,जेयेश केपाले,प्रथम नागापुरे,छोटू नागापुरे,प्रणु हुईके,अनिकेत कंनाके,सोहल आलाम,राहुल कोटरंगे,गजानन सडमेक,गणेश माणेपल्ली,विनीत मडावी,साई उईके,अनुराग पासपुनुरवार,अय्यप्पा भक्त गण सुरेश गुरुस्वामी पद्मागिरीवार,रवी भोयर,माधव गिलासपल्ली,मनोज गागापूरवार,अरुण सराफवार,मनोज बिट्टीवारसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here