Home मुख्य बातम्या राजाराम येते बुद्ध पौर्णिमा साजरी : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून...

राजाराम येते बुद्ध पौर्णिमा साजरी : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून टी-शर्ट भेट 

89
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / प्रतिनिधी राजाराम ( Rajaram )

अहेरी तालुक्यांतील राजाराम येते न्यू स्टार बौद्ध मंडळ कडून वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली असून तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेंडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निळा ध्वजारोहन मंडळाचे अध्यक्ष श्री.साईंनाथ दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आली.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पांढरे शुभ्र टी-शर्ट पाठवण्यात आले असून सदर टी-शर्ट अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके होते,तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.विठ्ठल भासरकर तर आभार प्रदर्शन स्वामी जनगाम यांनी केली.

यावेळी मंचावर गणपत दुर्गे,हनमतू गोंगले,शंकर गोंगले,जयराम दुर्गे,बोंदया दुर्गे,तुळशीराम बोरकर,नामदेव दुर्गे,दीपक अर्का,प्रभाकर दुर्गे,जुमडे काका,रामटेके मँडम,छत्रपती गोवर्धन,गोविंदा गोंगले आदि होते.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी तिरुपती दुर्गे,मधुकर गोंगले,भीमराव गोंगले,सुधाकर गोंगले,राजेश दुर्गे,व्येंकटेश गोंगले,विलास दुर्गे,भास्कर दुर्गे,किशोर गोंगले,सोनलाल बोरकर,हंनमतू झाडे,शंकर झाडे,रेखा गोंगले,लिंबूना गोंगले,व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here