एटापल्ली : तालुक्यातील आदिवासी बहुल अतिनक्षल ग्रस्त म्हणून ओळखले जाणारे पैमा येथील शाहिद बिरसा मुंडा क्लब पैमा यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गाव भूमिया पैमा महारु तलांडे – पैमाचे माजी पोलीस पाटील बीच्चू तलांडे होते.
या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी – एटापल्ली ग्रामसभा अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी – काँग्रेस नेते एटापल्ली प्रज्वल नागूलवार – डोलेश तलांडे कडूनदेण्यात येत आहे.तसेच तृतीय पारितोषिक मुख्याध्यापक ओंडरे सर – सहशिक्षक एम.व्ही.मडावी – सहशिक्षक डी.जी.धानोरकर जि.प.प्राथमिक शाळा पैमा कडून देण्यात येत आहे.
यावेळी विलास गावडे सरपंच बूर्गी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,रेणू तलांडी,महेश बिरमवार,कल्पना तलांडे ग्रामपंचायत सदस्य बुर्गी,मारोती तलांडे,जीवन तलांडे,सामाजिक कार्यकर्ते पोच्याजी तलांडे,अनिल करमरकर,नामदेव हीचामि,मोलाजी तलांडी पोलीस पाटील,गणेश गावडे ग्रा.प.सदस्य,बाळू आत्राम उपसरपंच गुरूपल्ली,कोलुजी तलांडी,तोडसा मडावी,पुरुसुजी आत्राम,बोड्डा तलांडी,संतोष बुरमवर,लक्ष्मण गावडे,विमल तलांडे,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल...