अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गडी महाकाली मंडळच्या नेतृत्वात सर्वधर्मीय विवाह सोहळा करण्यात आले. आयोजिलेल्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात दुर्गम व अतिदुर्गम गावातील गोरगरीब आदिवासी तसेच इतर समाजातील लोकांचे गोरज मुहूर्तावर १११ जोडप्यांवर अक्षता पडल्या. या निमित्ताने गावभर भोजन झाले. गडी महाकाली मंडळचे सदस्य प्रशांत ढोंगे नियोजनात हा पहिला सामूहिक विवाह सोहळा होता. भाजपचे राजे अम्ब्रीशराव महाराज हे सामूहिक विवाह सोहळा आयोजनाच्या माध्यमातून ते तब्बल १११ नवर देवाचे सासरे झाले.
पेरमिलीच्या भव्य प्रांगणात सायंकाळी सुसज्ज व नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या वेळी गोंडी, माडिया, व बौद्ध वधू-वरांचाही त्या-त्या पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला. सर्व वधू-वरांना रेशीमगाठी बांधताना शुभाशीर्वाद देण्यासाठी गावातील सरपंच किरण नैताम पेरमिली, प्रशांत ढोंगे पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत सभापती बोडाजी गावडे, बापू सडमेक, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, रामरेड्डी बड्डमवार माजी जिल्हा परिषद सदस्य, राजू आत्राम सरपंच पल्ले, उप सरपंच सुनील सोयाम याची प्रमुख उपस्थिती होते. आणि पेरमिली भागातील बहुसंख्येने व गावातील प्रतिष्ठिक नागरीक हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती.
विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून पेरमिलीच्या प्रांगणात ‘लगीनघाई’ दिसत होती. सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत सुमारे लाखो संख्येत वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. प्रशांत ढोंगे यांच्या नियोजनात आहेर, रुखवत व इतर विधिकार्याची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था पाहावयास मिळाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे यंदाचे पहिले वर्ष होते. गडी महाकाली मंडळच्या या सर्व १११ जावईबापूंना मानाचे आहेर करण्यात आले. राजे अब्रिशराव महाराज यांनी सर्व वधू-वरांना पती पत्नी यांच्यातील संबंध हे आयुष्याच्या शेवट पर्यंत प्रेमाने ठीकवावा व स्त्री जन्माचे महत्त्व समजावून सांगतिले. स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्रीभ्रूणहत्या करू नका, अशी शपथ सर्वाना देण्यात आली. नंतर सर्व वधू-वरांची ढोल ताशाच्या गजरात सामूहिक वरात काढण्यात आली. श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी सर्व वर-वधूंचे कन्यादान केले.
सायंकाळी गोरज मुहूर्तावर अक्षता पडल्यानंतर प्रांगणात फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. या सामूहिक विवाह सोहळ्याचे मोठ्या उत्सवाने “गडी महाकाली मंडळ” ने नियोजन केले होते.