Home अहेरी महागाव येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद

महागाव येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद

27
0

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग असलेल्या महागाव येथील आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून येथील गावकाऱ्यांसोबत संवाद साधत गावातील विविध समस्या त्यांनी जाणून घेतले.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पिण्याची पाण्याची समस्या,मुख्य पक्के रस्ते,नाली बांधकाम,असे अनेक प्रमुख समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या कंकडालवार यांच्या समोर मांडण्यात आले असता गावातील सर्व समस्यांची निराकरण करण्याचे प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी कंकडालवार यांनी गावकऱ्यांना दिली.

यावेळी राजू दुर्गे,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद रामटेके,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आदिवासी विध्यार्थी संघा व काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here