Home सामाजिक मूलकला फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिकच्या निषेध व्यक्त करत गावोगावी जनजागृती कार्यक्रम आयोजन

मूलकला फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिकच्या निषेध व्यक्त करत गावोगावी जनजागृती कार्यक्रम आयोजन

106
0

सिरोंचा : तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकीसा येते मूलकला फाउंडेशनच्या माध्यमातून आज जागतिक पेपर बॅग दिन निमित्ताने ( प्लास्टिकच्या )निषेध व्यक्त करत अंकीसा भागातील येत असलेल्या वडदाम ,कोत्तापल्ली,नाडीकुडा,रंगधमपेठा,अंकीसा या गावोगावी प्रत्येक किराणा दुकानात मूलकला फाउंडेशन अध्यक्ष सागर मूलकला यांच्या अध्यक्षतेखाली भेट देऊन प्लास्टिक मुळे होणाऱ्या परिणामाचे किराणा दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले.आणि प्लास्टिक कव्हरच्या वापर करून नये पेपर बॅगच्या वापर करा.असे माहिती देत पेपर बॅग फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.प्लास्टिक विषयावर जनजागृती करत जागतिक पेपर बॅग दिन साजरा करण्यात आले आहे.त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते राजम मूलकला, राजकुमार मूलकला ,उदय मूलकला, सारय्या मूलकला सह अंकीसा गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here