अहेरी : तालुक्यातील राजाराम येथील सूर्यापली येथे शिव मंदिर होते.मात्र मंदिर जीर्ण झाले असल्याने मंदिरचे पूर्ण बांधकाम करण्यासाठी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालावार यांच्या स्वखर्चाने बांधून देण्यात आले.
सदर मंदिराचे काम पूर्ण झाले असल्याने आज भगवान शिवशंकर आराधना पुजा कार्यक्रम व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजित करण्यात आले होते.यावेळी अजय कंकडालवार व त्यांची अर्धंगीनी काँग्रेसचे नेत्या – अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनलीताई कंकडालवार यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.त्यावेळी कंकडालवार दापात्यांनी मंदिरात जावून पुजा अर्चना करुन हवन करुन भगवान शिवशंकर मूर्तीची महाआरती करुन पूजा करण्यात आली.तसेच त्यावेळी भाविकांना महाप्रसादाच्या कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,मंदाताई कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,माजी उपसरपंच संजय पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य सुखदेव आलाम ऍड.एच के आकदर,तंटामुक्ती अध्यक्ष मुत्ताजी पोरतेट,माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण कंबागोनिवार,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,नरेंद्र गर्गम,नामदेव पेंदाम,भगवान तलांडे,पुरुषोत्तम अर्गेला,नारायण चालूरकर,तुळशीराम पोरतेट,सूर्यकांत आलाम,दिवाकर आलाम,महेंद्र कुसराम,जयराम आत्राम,दिपक आलाम,ज्योती आलाम, सावित्रीताई चिप्पावार,वंदुताई पोरतेट,प्रमोद गोडशेलवार,सचिन पंचर्यासह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.