Home मुख्य बातम्या Gadchiroli : रानडूकराने एक वेक्ती गंभीर जखमी : गडचिरोली तालुक्यातील घटना

Gadchiroli : रानडूकराने एक वेक्ती गंभीर जखमी : गडचिरोली तालुक्यातील घटना

92
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli )

 

गडचिरोली : तालुक्यात तेंदूपाने संकलन करण्यासाठी कुटुंबासह मारोड्याच्या जंगलात गेलेल्या मजुरावर रानडुकराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार, १३ मे रोजी सकाळी ७ वाजता घडली. पांडुरंग बालाजी मोहुर्ले (६१, रा. राखी, ता. गडचिरोली) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.पांडुरंग मोहुर्ले हे आपली तीन मुले व तीन सुनांसोबत गडचिरोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुरखळा उपक्षेत्रातील मारोडा जंगलात तेंदूपाने संकलन करण्यासाठी शनिवारी सकाळी ६ वाजता घरून निघाले. गावापासून जवळपास ४ किमी अंतरावरील मारोडाच्या जंगलात ते गेले.तेंदूपाने संकलनाच्या कामात व्यस्त असतानाच एक रानटी डुक्कर त्यांच्या दिशेने आले व पांडुरंग मोहुर्ले यांना गंभीररीत्या जखमी केले.मोहुर्ले यांच्या मुलांनी त्यांना लवकर घरी आणले व याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचान्यांना दिली.त्यानंतर गुरवळा येथील राजपाल खोब्रागडे यांच्या मदतीने मोहुर्ले यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here