



मुलचेरा : तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या श्रीरामपूर येथील रहिवाशी सत्यजित मंडल यांची पत्नी काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे भर्ती होऊन उपचार घेत आहे.
पण त्यांची त्याबेत खूप बिघडल्याने जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांनी खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यात यावी म्हणून त्यांना सल्ला दिले होते.मात्र सत्यजित मंडल कुटुंब अंत्यत गरीब असून त्यांना खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी सत्यजितला खूपच अडचण भासत होती.
आज सत्यजित मंडल यांनी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील वॉर्ड क्रमांक 10 येथे जनसंपर्क कार्यालयात जाऊन अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवार यांनी सत्यजित मंडल यांची अडचण बघून त्यांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी तसेच औषधीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आदी उपस्थित होते.