अहेरी : होळीला लागूनच येणारा सण म्हणजे रंगपंचमी,होळीनंतर म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते.रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण,आनंदाचा सण,उत्साहाचा सण. महाराष्ट्रात या सणाला धुलिवंदन अथवा धूळवड असंही म्हणतात.एकमेकांच्या अंगावर रंग उडवून पिचकारीने रंगाचे पाणी अंगावर उडवत आणि तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्याची पद्धत भारतात आहे.
काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो.मोठ्यांना आदराने कपाळावर टिळा लावून आणि समवयस्क आणि लहानांसोबत रंगाची उधळण करत हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे होळी व रंगपंचमी सण मोठ्या उत्सहात व थाटात संपन्न झालं आहे.आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तसेच काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी होळी व रंगपंचमी उत्सहात सहभाग होत गुलाल उघडत प्रेमाने रंग लावत सण साजरा करण्यात आली आहे.तसेच त्यावेळी अजय कंकडालवार यांनी शिक्षक,विध्यार्थ्यांना होळी व रंगपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी शाळेतील शिक्षक,विध्यार्थी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.