Home मुख्य बातम्या नागरिकांचे गुळगुळीत रस्त्यावार चालण्याचे स्वप्न भंगले

नागरिकांचे गुळगुळीत रस्त्यावार चालण्याचे स्वप्न भंगले

29
0

अहेरी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात सध्या विकासकामे चालू आहेत.शासनाचे उद्देश नागरिकांना गुडगुडीत रस्त्यावर जरी चालवण्याचे स्वप्न असले तरी अहेरी तालुक्यातील विदारक दृश्य समोर आले आहे.मरपल्ली ते करंचा रस्त्याचे काम चालू आहे चक्क या कामात संबंधित कंत्राटदाराने नाल्यातली मोठं मोठी दगड आणून रस्त्यावर पसरवून कामाला सुरुवात केली आहे.

नाल्यावरील व जंगलातील गोल स्वरूपाचे गोटे आणून रस्त्यावर टाकत पूर्णपणे खालच्या दर्जाचे व निकृष्ट स्वरूपाचं काम या कंत्रादारांकडून करण्यात येत आहे.यांच्यात 2 किलो मिटर रस्ताचे काम 100 – 100 मीटरचे तुकडे तुकडे पाडून ई निविदा न करता वेग वेगळ्या कंत्राटदारला देण्यात आले.आणि शासनाला दिशाभूल करण्यात आले.

संबंधित कंत्राटदार हा नागरिकांना व शासनाला चुना लावण्यात माहीर व आपली तिजोरी गरम करण्याच्या हेतूने असली कृत्य करतांना एकही पावलांची कसर सोडण्यात मागे हटताना दिसून येत नाही.सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असून संबंधित अधिकारी झोपेचा सोंग घेत आहे.अशे समजून येते कुठेतरी कंत्राटदार व संबंधित विभागाची साठगाठीवरून अशे घडत तर नसेल ना असा प्रश्न उपस्थित होतो.

सदर प्रकरण हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना लक्षात येताच स्वतः पाहणी करण्यासाठी गेले असता सदर रोड चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नाल्यातील दगडाने काम चालू होते.सदर या कामाची दखल घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी संबंधित संबधीत अधिकाऱ्याने जेवढे काम सुरू आहे त्या कामावर गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या काही दिवसातच सार्वजनिक बांधकाम विभाग आलापली कर्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here