Home अहेरी युवकांनी शिक्षणासोबतच खेळामध्ये ही शिखर गाठावे : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे...

युवकांनी शिक्षणासोबतच खेळामध्ये ही शिखर गाठावे : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

44
0

चामोर्शी : तालुक्यातील चौडमपल्ली येथील श्री साई स्पोर्टींग क्लब चौडमपल्लीच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून आष्टीच्या महात्मा ज्यो.फुले हायस्कूलचे प्राचार्य खरती सर होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चामोर्शी बाजार समितीचे माजी सभापती शरद कोलेटीवार होते.उपाध्यक्ष म्हणून आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे साहेब होते.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तसेच या स्पर्धेला द्वितीय आणि तृतीय पण ठेवण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊंची येथील गावकर्यांन कडून ढोल तशाने जंगी स्वागत करण्यात आली.तसेच त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी येथील नागरिकांची प्रत्येक समस्या जाणून घेतले आहे.

यावेळी आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे अध्यक्ष – उपाध्यक्ष – सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here