Home गडचिरोली जिल्ह्यातील तात्काळ उन्हाळी धान खरेदी सुरु करा : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...

जिल्ह्यातील तात्काळ उन्हाळी धान खरेदी सुरु करा : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी

75
0

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न आल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना मध्ये सरकरप्रति तीव्र नाराजी व असंतोष पसरलेलं आहे.या तीन – चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिकांची अतोनात नुकसान झाले होते.

महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ८ लाख ५५ हजार रूपयाचे धान खरीप हंगामात आविका संस्थांच्या मार्फतीने खरेदी करण्यात आले आहे.यापैकी १ लाख ७१ हजार धान शेडमध्ये तसेच काही धान गोदामामध्ये साठवून ठेवण्यात आले आहे.या अहेरी उपविभागातही तब्बल ४ लाख ९ हजार क्विंटल धान सध्यास्थितीत उघड्यावर आहे.महामंडळाच्या ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाला अवकाळी पासवाचा फटका बसत आहे.पुन्हा जुन महिन्यांपासून पावसाने जोरदार झोडपल्यास नुकसानीला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासन,प्रशासन की वरीष्ठ अधिकारी हे सध्यातरी अनुत्तरीत आहे.

साठवून ठेवलेल्या त्या शेतकऱ्यांचा अडचण लक्षत घेऊन माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी समंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनिवरून संवाद साधून शेतकऱ्यांची समस्या सांगण्यात आली आहे.येत्या दोन – चार दिवसात जर उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायटी मार्फत धान खरेदी न केल्यास धान उत्पादक शेतकरी,शेतमजूर व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाही पध्दतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक तथा माजी जि.प. अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here