अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील हनुमान मंदिरात श्रीराम नवमी निमित्य आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी हनुमान लल्लाचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केले.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोल्ली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख समृद्धी लाभोया साठी बजरंगबाली हनुमान कडे प्रार्थना केले.
दर्शन दरम्यान मंदिर कमिटीच्या सदस्यांनी माजी जिल्हा परिषद अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतु मडावी यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले
त्यानंतर अहेरी येथे श्रीराम नवमी निमित्त राम लल्ला’ची मिरवणूक काढण्यात आली आहे.यावेळी त्या रॅलीत काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मिरवणुकीत सहभाग दर्शविला.
यावेळी भाजपचे नेते संदीपभाऊ कोरेत,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे कार्तिक तोगम,संतोष अग्रवाल,अमित येणफ्रेड्डीवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील जेष्ठ नागरिक – भक्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.