Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी खबरदार महाराष्ट्र...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी खबरदार महाराष्ट्र न्यूज चॅनेल”ला”दिली सदिच्छा भेट

75
0

अहेरी : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आलापल्ली येथील”खबरदार महाराष्ट्र”या न्युज पोर्टल च्या कार्यालयाला भेट दिली.मागील अनेक वर्षापासून आपल्या निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेले खबरदार महाराष्ट्र न्यूज पोर्टल व चॅनलने गडचिरोलीसह महाराष्ट्रातील विविध भागात आपला ठसा उमटवला आहे.पत्रकारिता हे निष्पक्ष व निर्भीड असावी हे ब्रीदवाक्य घेऊन आपली पत्रकारिता क्षेत्रात वेगळे अस्तित्व निर्माण करणारे संपादक विशाल वाळके यांच्या कार्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकाडालवार यांनी कौतुक केले.खबरदार महाराष्ट्र सारख्या डिजिटल माध्यमांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागातही आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.आपल्या वृत्तसेवेच्या माध्यमातून दुर्गम कष्टकरी अन्यायग्रस्त भागातील नागरिकांचे प्रश्न आपण सतत मांडत राहावे त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळेस माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकाडालवार यांनी उपस्थितांना दिले.यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here