Home मुख्य बातम्या ( 2024 Election’s ) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपा व काँग्रेसकडून यानावे चर्चेत

( 2024 Election’s ) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपा व काँग्रेसकडून यानावे चर्चेत

75
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli )

गडचिरोली : सध्या लोकसभा अणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरवात झाली असून कोणकोणते उमेदवार रिंगणात राहणार याकडे जनतेचेही लक्ष लागून आहे.गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रात यावेळी भाजप विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनाच पुन्हा संधी देणार की नवा चेहरा देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या एका गटाकडून गडचिरोली विधानसभेसाठी डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव पुढे केले जात असल्याची माहिती आहे. डॉ नरोटे हे मूळचे चामोर्शी तालुक्यातील असून गडचिरोलीत ते वैद्यकिय व्यवसाय करतात.

त्यांनी स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली असून ते विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित झाले आहे. त्यांना भाजपकडून तिकीट नाहीं मिळाली तर ते अपक्ष म्हणूनही नशीब आजमवणार आहेत अशी माहिती आहे. गटबाजीला थारा नसलेल्या भाजपमध्ये जिल्हयात कधी नव्हे ते दोन गट पडलेले असून सलग दोन टर्म निवडून आलेले विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांनाच भाजप तिकीट देणार की नवा डॉक्टर उमेदवार देणार? याकडे विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे कांग्रेसमध्येही इच्छुकांची भाऊगर्दी असून डॉ, चंदा कोडवते, डॉ, नामदेव उसेंडी, विश्वजित कोवासे यांची नावे चर्चेत आहे. डॉ नामदेव उसेंडी 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 व 2019 या दोन लोकसभा निवडणूकीत त्यांना काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी मिळाली ते पराभूत झाले. यावेळी ते पुन्हा लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असून काँगेस त्यांना पुन्हा तिकीट देणार की? गेल्या पाच वर्षापासून मतदारांशी सातत्याने जनसंपर्क ठेवणाऱ्या डॉ. नामदेव किरसान यांना तिकीट देणार हे तिकीट वाटपानंतर स्पष्टच होणार आहे. नामदेव उसेंडी यांना लोकसभेची तिकीट न मिळाल्यास ते गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा कांग्रेसचे तिकिट मागणार असल्याची काँगेस मध्ये चर्चा आहे. गेल्या निवडणूकीत काँगेसकडून डॉ. चंदा कोडवते यांना काँग्रेसने संधी दिली त्या पराभूत झाल्या. आता त्यांनी मतदारसंघात दौरे करण्यास सुरवात केली असून त्याही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार समजल्या जाात आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे राजकीय वारसदार विश्वजित कोवासे यांचे नाव सुध्दा यावेळी चर्चेत आहे. ऐनवेळी तिकीट वाटप करून उमेदवाराला प्रचाराची फारशी संधी न देणारी कांग्रेस यावेळी अगोदरच उमेदवारी जाहीर करणार की ऐनवेळी तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकंदरित गडचिरोली विधानसभा क्षेत्रात निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करण्यास सुरवात केली असून वर्षभर यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगविल्या जातीलच.. पण माय बाप मतदार कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार हे निवडणुक झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here