Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालावार यांनी 36 गावच्या...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालावार यांनी 36 गावच्या शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतले

39
0

एटापल्ली : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल एटापल्ली तालुक्यात दौरा केली होते.

दौऱ्यात तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी संस्था उंडेरा,हेड्री,अंतर्गत येत असलेल्या 36 गावच्या शेतकऱ्यांच्या समस्या बारदाना ची समस्या सातबारा ऑनलाईन करणे हमाली हमालीची थक बाकी व अनेक विविध समस्या शेतकऱ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालावार यांच्या समोर मांडले असता.

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बरगमकर साहेबांना दूरध्वनी द्वारे बोलून शेतकऱ्यांचे समस्या त्वरित मार्गी लावण्याचे सांगीतले असता.येत्या पाच ते सहा दिवसात आपल्या समस्यांचे निराकरण करुण समस्या मार्गी लावण्याची ग्वाही माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी शेतकऱ्यांना दिली.तसेच शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली.त्यावेळी गावातील समस्त शेतकऱ्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी एटापल्ली तालुका सचिव प्रज्वल नागुलवार,आदिवासी विविध सहकारी संस्था सचिव पदा,पोलिस पाटील अजय गावडे,सतू गावडे,चांदेकर काका,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,राकेश सडमेकसह 36 गावाचे शेतकरी – आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here