अहेरी : तालुका अंतर्गत येत असलेल्या वेलगुर येथील आविसं’काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातील गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले होते.
सदर चर्चेत येथील गावकऱ्यांनी विविध समस्या मांडण्यात आले होते.त्यानंतर गावातील नागरिकांनी गावातील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहत कार्यक्रम घेण्यासाठी अडचण बसत होत आहे.त्यामुळे गावांसाठी माता मंदिर बांधून देण्यात यावी.अशी विनंती केली असता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना शब्द दिले होते.माझ्या स्व:खर्चतून माता मंदिर बांधून देतो असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार माता मंदिर बांधकामाला सूरवात झाल्याने आज काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी त्या ठिकाणी बांधकामाची पाहणी केली.गावकऱ्यांनी या धार्मिक कामाप्रति नागरिकांनी कंकडालवार यांचे आभार मानले व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर,अशोकभाऊ येलमुले माजी सरपंच,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,स्वप्नील भाऊ मडावी,प्रशांत गोडसेलवार,पूनेश कदीकुनिवर,अनिल आत्राम,अक्षयभाऊसह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.