Home गडचिरोली अक्षय तृतीया दिवशी जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क राहावे

अक्षय तृतीया दिवशी जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क राहावे

107
0

जिल्हाधिकारी संजय मिणा यांचे स्थानिक प्रशासनास निर्देश

गडचिरोली,(जिमाका) बाल विवाह प्रतिबंध अधिनियम व त्याबाबतचे नियम आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू आहे. येत्या 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात हे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणानी सतर्क राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले.
बाल विवाह प्रतिबंध अधिनियमान्वये मुलाचे व मुलीचे विवाहकरीता मुलाच्या वयाची २१ वर्षे पूर्ण व मुलीचे १८ वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. विवाह करणारे मुलगा व मुलगी यांनी विवाह वेळी मुलीचे वय १८ वर्ष वय व मुलाचे 21 वर्षाअगोदर विवाह केल्यास सदर विवाह हा बाल विवाह ठरतो. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये तरतुदीनुसार जो कोणी बाल विवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसुर करेल यामध्ये बालविवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती विरोधात एक लाख रुपयापर्यंत दंड असू शकेल आणि दोन वर्षापर्यंत सक्षम कारावास शिक्षेस देखिल तरतूद केलेली आहे.
गडचिरोली जिल्हा बाल विवाह मुक्त व्हावा याकरिता विवाह समारंभ सोहळपास प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या मदत करणारे सर्व लग्न पत्रिका छपाई करणारे प्रिंटिंग प्रेस चालक, मंडप डेकोरेशन चालक, फोटो ग्रापर, आचारी, मंगल कार्यालय, लान सभागृह व्यवस्थापक बैंड वादक, काटरिंग चालक, विविध जाती धर्मातील श्रध्दास्थाने व इतर यांनी विवाह संमारंभाची बुकिंग कार्य घेताना मुलाच्या तसेच मुलीच्या विवाहाकरिता मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्याची खातरजमा करूनच होण्या-या विवाहासंबंधीत कामाची बुकिंग घेणे बंधनकारक राहील. याबाबतचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्हात लागू केले आहे.
जिल्हात कुठेही झालेले विवाह हे बालविवाह झाल्याचे निर्दशनास आल्यास बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहास उपस्थित असणारे तसेच विवाहास सहकार्य करणारे सर्व आस्थापना चालक व लग्न लावुन देणारे संबंधित धर्माचे व्यक्ती यांच्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
बालविवाह प्रतिबंध करणेकरिता शासनाने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणुन नेमणुक केली आहे. जिल्हात होणारे बाल विवाह प्रतिबंध करण्याकरिता बाल विवाह प्रतिबंध अधिकारी यांनी तसेच मुख्याधिकारी नगर परिषद नगर पंचायत यांनी त्याच्या कार्यक्षेत्रात विवाह समारंभ / सोहळास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणारे सर्व आस्थापना अधिक यांची बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायदयाची अंमलबजावणी करण्याकरिता बैठक घेवून त्यासंबंधितचा लेखी अहवाल मा. प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली बरेक क्र.1 खोली क्र. २६,२७ कलेक्टर कॉम्प्लेक्स गडचिरोली यांच्याकडे सादर करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी निर्गमित केले आहे.
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याबाबत माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावे किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले 9403704834 या नंबरवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here