Home अहेरी इंदाराम येथील हनुमान मंदिरात कंकडालवार दाम्पत्याची पूजा-अर्चना कार्यक्रम संपन्न

इंदाराम येथील हनुमान मंदिरात कंकडालवार दाम्पत्याची पूजा-अर्चना कार्यक्रम संपन्न

23
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील आज हनुमान जन्मोत्सव निमित्त आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार दाम्पत्यानी हनुमान मंदिरात पवनसुता हनुमान यांचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केले आहे.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयसाठी बजरंगबाली ला प्रार्थना केली.येथील हनुमान मंदिरात भक्तजनाच्या उपस्थितीत जन्मोत्सव कार्यक्रम मोठया थाटात पार पडला.

यावेळी काँग्रेस नेते व इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,स्मिता वैभव कंकडालवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here