अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील श्रीभगवान हनुमान जयंती निमित्त बजरंग चौक येथील युवक – टायगर ग्रुपच्या पदाधिकारी तर्फे दरवर्षी प्रमाणे या’वर्षी सुद्धा भव्य शोभायात्रा काढण्यात आले आहे.
त्यावेळी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पवनसुता हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेत सहभागी होऊन भगवान हनुमान भक्तांच्या आनंद द्विगुणीत केले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,टायगर ग्रुपचे पदाधिकारी साई तूलसीगीरी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बबलू शेख,विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच टायगर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य – हजारोंच्या संख्येने आलापल्ली नगरवासी उपस्थित होते.