Home मुख्य बातम्या नागदेवता – गणेश मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची उपस्थित

नागदेवता – गणेश मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची उपस्थित

21
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील वी.दा.सावरकर चौक हनुमान मंदिरात हनुमान जन्मोउत्सव निमित्त नागदेवता तसेच गणपती मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम आयोजित केले होते.आयोजित कार्यक्रमाला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाले.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भगवान हनुमानजी,नागदेवता तसेच गणेश मूर्तीचे विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.दरम्यान अजयभाऊंनी समस्त जनतेला हनुमान जन्मोत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी काँग्रेसनेते कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयासाठी बजरंगबली हनुमान,नागदेवता,गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली.दर्शना दरम्यान कंकडालवार यांनी येथील स्थानिक समस्या जाणून घेतले आहे.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,टायगर ग्रुपचे पदाधिकारी साई तूलसीगीरी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बबलू शेख,रवी मुपीडवार,विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आलापल्ली नगरवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here