अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील वार्ड क्रमांक 6 येथील श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या धोबी – वरटी समाज संघटना तर्फे संत गाडगेबाबा स्मृती भवन येथे गाडगे महाराज जयंती कार्यक्रम आयोजित केली आहे.येथील जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या आयोजित कार्यक्रमाला आविसं’भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उपस्थित राहून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करून.या कार्यक्रमाला मार्गदर्शन तसेच आर्थिक मदत केली आहे.
यावेळी स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धोबी वरटी संघटनेचे पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.