Home राजकीय अहेरी उपविभागातील समस्यांचे निराकरण करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंत्री...

अहेरी उपविभागातील समस्यांचे निराकरण करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे निवेदन देऊन मागणी

88
0

Aheri Today News Network : आज अहेरी येते वन मंत्री सुधीरभाऊ आले होते.अहेरी क्षेत्र अविकसित असल्याने खालील विकासकामांना निधी उपलब्ध करून मंजुरी देण्यात यावी.अहेरी विधानसभेतील विकास कामे खालील प्रमाणे असे निवेदन देण्यात आले.

१.अहेरी येथील प्राणहिता नदीवर लिप्ट ऐरीगेशन,करून शेतकऱ्यांना पाण्याची सोय सुविधा करण्यात यावी.

२.आलापल्ली अहेरी रस्ता सुरजागड लोह खनिज वाहतूकीमुळे खराब झालेला रस्ता बनविण्यात यावे, व सुरजागड लोह खनिज वाहतूक बंद करण्यात यावे

३. मागील वर्षी २०२१-२२ मध्ये आलापल्ली ते अहेरी पर्यंत मेनरोड लगत शेतकन्याचे शेती नुकसान सुरजागड लोह खनिज वाहतूकीमुळे झालेल्या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान भरपाई देण्यात यावे.

४. अहेरी येथील मुख्य रस्त्याचे रूंदीकरण व रस्त्याकरीता निधी मंजुर करण्यात यावी.

५.अहेरी विधान सभेतील नगर पंचायत मध्ये मुख्यधिकारी पद नियुक्त करण्यातयावी.

६. अहेरी विधानसभा येथील प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक भवन मंजुर करण्यात यावे. ७.अहेरी विधानसभा क्षेत्रात ग्रामिण भागातील रस्त्याचे कामे प्रलंबित आहेत ते कामे मजुर करून निधी उपलब्ध करून द्यावी.

८. कागजनगर ते अहेरी पर्यंत रेल्वे चालु करण्यात यावी.

9.भुमी उप अभिलेख विभाग अहेरी येथे जमीनीच्या खोटे दस्तावेज तयार करून खोटे प्रॉपर्टी कार्ड, मृत्यूनंतर जिवंत असल्याने दाखवून पोट हिस्सा व फेरफार करण्यात आले याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. (सन २०१७ मे २०२३ पर्यंत

१०. अहेरी नगर पंचायत अंतर्गत खाजगी ले-आउटमध्ये शासकीय निधी चे वापर करून विकसीत करण्यात आले.त्यांची चौकशी करून खाजगी ले-आउट धारकांकडून रक्कम वसूल करण्यात यावी.

११.अहेरी विधानसभा क्षेत्रात काही ठिकाणी विद्युत पुरवठा पोहचली नाही,त्या ठिकाणी विद्युतपुरवठा पोहचविण्यात यावी.

१२. अहेरी येथे ३३ के.वी. स्टेशन तयार करण्यात यावी,तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदे भरण्यात यावे.आदि मागणी साठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषीं उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यानी नामदार श्री.सुधीरभाऊ मूनगंटीवार याच्या कडे निवेदन देवून मागणी केली.

अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,ज्योती सडमके नगरसेविका,मिना ओंड्डरे महिला व बालकल्याण सभापती,सुरेखा गोडशेलवार नगरसेविका नगरपंचायत अहेरी,सूनीता कुसनाके माजी जिल्हा परिषद सदस्य,सुरेखा आलाम ,नौरास शेख बांधकाम सभापती,विलास गलबले नगरसेवक,महेश बाकेवार,नगरसेवक,प्रशांत गोडशेलवार नगरसेवक,विलास सिडाम नगरसेवक,सुरेखा गोडशेलवार नगरसेविका,गुलाबराव सोयांम माजी सरपंच विद्यमान ग्रा.पं.सदस्य,मीना गर्गम ग्रा.पं.सदस्य,नरेंद्र गर्गम ग्रामीण तालुका अध्यक्ष आविस व अजयभाऊ मिञपरिवार,राकेश आलुरवार,विनोद रामटेके,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here