Home अहेरी आदिवासी व दुर्गम भागातील विध्यार्थी कलेक्टर झाला पाहिजे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार...

आदिवासी व दुर्गम भागातील विध्यार्थी कलेक्टर झाला पाहिजे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांचे प्रतिपादन

61
0

अहेरी : तालुक्यातील SB कॉलेज अहेरी आणि राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येते आदिवासी विध्यार्थी संघ विदर्भ नागपूर जिल्हा गडचिरोली व मिशन IAS अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व गैर आदिवासी विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे मार्गदर्शन शिबीर संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आले. त्यामद्ये कोरची,कुरखेडा, मलेवाडा वडसा,गडचिरोली,अहेरी,आलापल्ली, चामोर्शी,मूलचेरा,एटापल्ली भामरागड,सिरोंचा,आरमोरी, धानोरा”या तालुक्यातील महाविद्यालयन विध्यार्थ्यांना IAS अधिकारी होणारच व स्पर्धा परीक्षाची ABCD या वार मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.या शिबीराची मुख्य मार्गदर्शक IAS अकॅडमि अमरावतीचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे व आविसंचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे हे होते.यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रामुख्याने उपस्थित होते. राजे धर्माराव महाविद्यालयत या शिबीराचे मार्गदर्शक करतांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कांकडालवार म्हणले की”आदिवासी विध्यार्थी संघाचा वतीने स्पर्धा परीक्षेची ABCD ही पुस्तक विध्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात येत असून या पुस्तकांचा माध्यमातून विध्यार्थ्यांना अभ्यास केल्यास निश्चितच अधिकारी होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला.

डॉ.नरेशचंद्र कठोडे म्हणले की”शेतकऱ्यांची मुले सुद्धा IAS अधिकारी होऊ शकतात त्यासाठी दररोज वर्तमान पत्रा वाचावे व रोजचा अभ्यास रोज करावे.व तारूण्याचे तीन त कार तात्परता तेजस्विता व तपस्विता या गुणांचा अंगीकार केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते.

नंदुभाऊ नरोटे म्हणाले कि”मी IAS अधिकारी होणारच व स्पर्धा परीक्षेची ABCD या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यामागचा उद्देश हाच आहे कि गडचिरोली जिल्ह्यातील एक तरी विद्यार्थी IAS होऊन या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून आला पाहिजे.

यावेळी उपस्थिती माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक विध्यार्थी विध्यार्थ्यांनी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here