अहेरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला पार पडले आहे.काल विधानसभा निकल लागले आहे.ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघतुन सलग तिसऱ्यांदा मोठा मताधिक्याने आमदार म्हणून विजयभाऊ वडेट्टीवार निवडून आल्याबद्दल काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी यांनी वडेट्टीवारांची ब्रम्हपुरी निवास्थानी भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिले.
यावेळी काँग्रेसनेते प्रज्वल नागूलवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शिवराम पुल्लूरीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.