Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भोई समाज भवनाचे उद्घाटन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भोई समाज भवनाचे उद्घाटन

66
0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील भोई समाजाच्या समाजभवन नसल्यामूळे सांस्कृतिक,परंपरागत रूढी परंपरा,चालीरीती यांचे जोपासना करण्यासाठी व समाजाचे कार्यक्रम घेण्यासाठी समाज भवन नसल्याने अडचण होत होती.भोई समाज बांधवांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे समाज भवनाची मागणी केली असता मागणीची दखल घेऊन १५ वित्त आयोग जिल्हा परिषद स्तर अंतर्गत निधी उपलब्ध करून दिले.आज समाज भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून.सदर समाज भवनाचे लोकार्पण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.त्यावेळी समस्त नागरिकांनी अजयभाऊंची आभार म्हणले.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक येलाय्या तोकला,ग्रामपंचायत सरपंच एल एम कन्नाके, ग्राम पंचायत उपसरपंच हरिष गावडे, ग्रामपंचायत सचिव लाडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य महेश लेकुर,शंकर आत्राम,संजय गोंडे,नरेंद्र गर्गम, श्रीनिवास राऊत संदीप दुर्गे,सांबाया तोकला,शंकर गानला,मंचार्ला चंद्रया,मलेश गाणला,नागेश तोकला,व्यंकणा गांडला,शंकर तोकला,गणेश तोकला,संतोष तोकला,चंद्राया गांडला,श्रीनिवास तोकला,गोरुबाई तोकला,रामक्का गांडला,लक्ष्मी तोकला,समक्का मंचारला,गंगुबाई तोकला,अंकुबाई तोकला,राजेश्वरी तोकला,शांताबाई तोकलासह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच समस्त भोई समाज बांधव गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here