मुलचेरा : तालुक्यातील कोठारी येथील प्रभाकर कडते यांची जेष्ठ कन्या वधू – हसीनी अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथील संभा तलांडे यांचे जेष्ठ चिरंजीव वर – राहुल यांच्या विवाह वराचा मंडपात कसमपल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,माजी सरपंच शशिकला पेंदाम,अविनाश वेलदी,जोगा मडावी,गणेश सोयाम,रामदास मडावी,विनोद मडावी,पंकज मडावी,शामराव पेंदाम,विलास वेलदी,शामराव तलांडे,प्रमोद वेलदी,पाटाडो पलो,राजू वेलदी,सोवराम सिडाम,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.