Home अहेरी मलमपोडूर येथे ख्रिस्ती समाजाचे आत्मिक जागृती सभा थाटात संपन्न

मलमपोडूर येथे ख्रिस्ती समाजाचे आत्मिक जागृती सभा थाटात संपन्न

57
0

भामरागड : तालुक्यातील मलमपोडुर येथे क्रिस्ती समाज बांधवाकडून आत्मिक जागृती सभेचे आयोजन करण्यात आला होता.या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी हे प्रामुख्याने उपस्थित होते.या आत्मिक जागृती सभेत समाज बांधवाकडून काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार आणि हणमंतू मडावी यांच्या शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशू यांच्या शांतिप्रिय प्रार्थनेने करण्यात आली होती.या सभेत काँग्रेस नेते कंकडालवार यांनी शांती अन अहिंसेवर उपस्थितीतांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.या कार्यक्रमची यशस्वीतेसाठी फास्टर गिसू पुंगाटीसह इतर फास्टरांनी केले.

यावेळी भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,भामरागड नगरपंचायतचे नगरसेवक विष्णू मडावी,सुधाकर तिम्मा,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवारसह या सभेला येशू मसीहाचे समाजबांधव तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here