Home अहेरी एटापल्ली तालुक्यात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी दाखविली ताकद

एटापल्ली तालुक्यात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी दाखविली ताकद

32
0

गडचिराेली : जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ३ ग्रामपंचायतीच्या पाेटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमाेजणी ७ नाेव्हेंबर राेजी प्रत्येक तालुका मुख्यालयात झाली.यात आविसं अजयभाऊ मित्र परिवारने घवघवीत यश मिळवून एटापल्ली तालुक्यातील हालेवारा ग्रामपंचायतींवर एकुण ७ सदस्य निवडून वर्चस्व मिळविले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील राजकीय ताकद दाखविली.

जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर ३ ग्रामपंचायतींच्या पाेटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला हाेता.हालेवारा ग्रामपंचायतीची उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली.”या”मध्ये संध्या कन्नामवार यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

निवडीचे श्रेय नवनियुक्त उपसरपंच व सदस्यांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना दिले.आपण गाव विकासासाठी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या नेतृत्वात प्रयत्न करणार व ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यास”त्या”सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

आणि ऐवढेच नाहीतर गावातील पाणी समस्या,रस्ते,विज,अशा ग्रामस्थांच्या मुलभूत सुविधा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात सोडविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त उपसरपंच आणि सदस्यांनी बोलताना सांगितले.

उपसरपंच पदी संध्या देविदास कन्नामवार यांची निवड झाल्याबद्दल आणि ग्रामस्थांनी निवडून दिल्याबद्दल आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्रामस्थांचे व नवनियुक्त उपसरपंच आणि सदस्यांचे आभार मानले

यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टमी,सचिव प्रज्वल नागूलवार,रमेश वैरागडे,ग्रामपंचायत सदस्य नितेश नरोटे,सदस्य रेश्मा नरोटे,सदस्य भरती गेडाम,सदस्य मनोज गोटा,सदस्य लोकेश मडावी,सुरेश मट्टमी,सैनू मट्टमी,स्वप्नील कन्नामवार,उमेश दासरवार,रामू किरंगा,दिवाकर इप्पावार,चंदू मट्टमी,सुशील कन्नामवार,आडवे कांदे,नंदू कांदे,संतोष गावडे,रावजी नरोटे,संतोष गेडाम,सुनील नरोटे,कोके मट्टमी,चमूर उसेंडी,मधुकर मट्टमी,सोमाजी नरोटेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here