Home अहेरी मतूआधर्म महासंम्मेलन – हरीनाम महायज्ञ कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांची उपस्थित

मतूआधर्म महासंम्मेलन – हरीनाम महायज्ञ कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांची उपस्थित

66
0

अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोद्दूमाडगू येथील मतूआधर्म महासंम्मेलन तथा श्रीश्री.हरीनाम महायज्ञ कार्यक्रमांचे आयोजन श्रीश्री.हरिगुरुचांद मतूआ मिशन आलापल्ली द्वारा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख अतिथी म्हणून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमाला मार्गदर्शन केली.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी श्रीश्री हरिचांद स्वामीचे दर्शन घेऊन त्या कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही”हरिचांद स्वामी कडे दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.

यावेळी यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,उपसरपंच रमेश शानगोंडावार,ग्रामपंचायत सदस्य तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,ग्रा.पं.सदस्य बेबीताई मंडल,वेलगुर ग्राम पंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,नरेंद्र गर्गम,जितेंद्र हलदर,हिमांतो गोसाई,जगदीश गोसाई,नारायण अधिकारी,निखिल मंडल, गणेश सिकदर,प्रदीप मंडल,किशोर महालार प्रसेंजित विश्वास,ठाकूर महलदर,परिमल हळदर,रतिकांत मंडळ,सचिन बिश्र्वास,साधन मालाकार,सुनील हलदार,नारायण नाथ,रणजित हलदार,दिलीप रॉय,सपान विश्र्वास,परिमल मंडल युवा सदस्यसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here