अहेरी : तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गवरील नागमाता मंदिर देवस्थान येते नागपंचमी निमित्त हजारो भाविकांचा अलोट गर्दीने नागपंचमी मोठ्या उत्साहात पार पडला आहे.जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येऊन पूजा करतात.नागदेवता आणि शंकर भगवानची पूजा आणि अभिषेक करून दूध आणि मखाना यांचा नवैद्य अर्पण करतात.
नागपंचमी निमित्त आज काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी नागमातेच्या विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले आहे.
तसेच त्यावेळी नागदेवता मंदिर ठिकाणी कंकडालवार व मडावी परिवाराकडून भाविकांना महाप्रसाद व केळी वितरण करण्यात आली आहे.त्यावेळी परिसरातील नागरिक,भाविक महाप्रसादाची आस्वाद घेतले.तसेच त्यावेळी कंकडालवारांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व भाविकांना नागपंचमी निमित्त शुभेच्छा दिले.
यावेळी सुनीताताई कूसनाके माजी जि.प.सदस्य,अजय नैताम माजी जि. प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,स्वप्नील मडावी,लक्ष्मण कोडापे सरपंच नागेपल्ली,रमेश शानगोंडावार उपसरपंच नागेपल्ली,शंकरीबाई सरपंच गोविंदगाव,वंदना दुर्गे सरपंच महागाव,प्रमोद गोडसेलवार,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,बबलू भैय्या स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाविक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.