अहेरी : तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोंकापरी येथील जय पेरसापेन व्हाॅलीबाॅल मंडळ कोंकापरी द्वारा भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली आहे.
या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं काँग्रेसचे नेते व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी कडून देण्यात येत आहे.तसेच तृतीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे – राजाराम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय पोरतेट कडून देण्यात येत आहे.
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गावात आगमन होतच येथील नागरिकांनी विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत करण्यात आली आहे.त्यावेळी सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा – डॉ बाबासाहेब आंबेडकर – वीर बबूराव शेडमाके यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केली.तसेच कोंकापरी येथील नागरिकांची समस्या जाणून घेतले.
या कार्यक्रमाचे सहउदघाटन आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस नेते व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निसार हकीम ( पप्पू ) – माजी जि.प.सदस्य अजय नैताम होते.
यावेळी उपस्थित माजी उपसरपंच अशोक येलमुले,राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कांबगौनीवार,तंटामुक्ती अध्यक्ष मुत्ताजी पोरतेट,राजाराम ग्रामपंचायतचे माजी सदस्य नारायण कांबगौनीवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुरक्षा अकुदारी,देवालमारी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,माजी उपसरपंच संजय पोरतेट,सुखदेव आलम ग्रा.पं. सदस्य,कु.पूजा सोयम ग्रा.पं सदस्य,सौ.सांजवली अर्गेला ग्रा.पं.सदस्या,सौ.यशोदा आत्राम ग्रा.पं.सदस्या,ॲड.एच.एस.के.एस.अकदार,सुरेश सोयाम, रज्जाकभाई पठाण चांदूरशाही आलम,नामदेव पेंदाम,सुरेश पेंदाम,नारायण चालुरकर,धर्मा पेंदाम,रघुनाथ मडावी पाटील,पांडू गावडे,मधुकर झोडे,विजू तलांडी,सौ.लक्ष्मीताई श्रीरामवार माजी सरपंच खांदला,जयवंता गोलेटी ग्रा.प.सदस्या,ज्योती आलम ग्रा.प.सदस्य,विश्रांती चालुरकर ग्रा.प.सदस्य,सुधाकर आत्राम माजी ग्रा.पं.वसंत सडमेक,दीपक अर्का,रुपेश तलांडे,ज्योती आत्राम मॅडम,माहेश्वरी सोयाम अंगणवाडी सेविका,सूर्यकांत आत्राम,सतीश सडमेक,राकेश सडमेक,नरेंद्र गर्गम,प्रमोद गोडसेलवार,राकेश अल्लूरवार,मोहन वेलादी,सुरेश पेंदाम,नामदेव पेंदाम,श्रीनिवास राऊतसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल...