Home राजकीय मडवेली ग्रामपंचायत येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एक हाती सत्ता

मडवेली ग्रामपंचायत येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एक हाती सत्ता

40
0

भामरागड : तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून काल उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली आहे.त्यामध्ये मडवेली ग्रामपंचायत मध्ये पाच सदस्य निवडून आले होते.काल घेतलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकित परमेश बापू मडावी”हे”उपसरपंच पदी विराजमान झाले.तर थेट सरपंच निवडीत मलेश दस्सा तलांडे”हे”विराजमान झाले.

उपसरपंच निवड झाल्या नंतर ग्रामपंचायत समोर संपूर्ण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.त्यावेळी सरपंच उपसरपंच सदस्यांनी बोलतांना सांगितले”कि”माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात गावातील प्रत्येक समस्यांची निराकरण करण्यात येईल असे बोलतांना सांगितले.

यावेळी भामरागड नगर पंचायतचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विष्णु मडावी,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सैनुभाऊ आत्राम, नवनिर्वाचीत सरपंच मलेश तलांडे, व सर्व नवनिर्वाचित सदस्य अविस कार्यकर्ते नरेंद्र गर्गम, चिनू सडमेक, प्रभाकर मडावी, दिनेश जुमडे, भास्कर सडमेक, काशिनाथ मडावी, लक्ष्मण शेगाम, देशू सडमेक, सदाशिव तलांडीसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here